हिंदुस्थानची 27 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी

थायलंडमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने 27 पदकांची लयलूट करीत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करीत इतिहास घडविला.

हिंदुस्थानी खेळाडूंनी 4 सुवर्ण, 10 रौप्य व 13 कांस्य पदकांची कमाई केली. पदकविजेत्यांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता थुलसिमथी मुरुगेसन व पॅरिस पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेता मनीषा रामदास यांचाही समावेश आहे. हिंदुस्थानने मिश्र दुहेरीच्या एसएल3-एसयू5 या स्पर्धेत वर्चस्व गाजवीत तीनही पदके जिंकण्याचा पराक्रम केला. नितेश कुमार व तुलसीमती मुर्गेसन या हिंदुस्थानी जोडीने रुथिक रघुपती व मानसी जोशी या आपल्याच देशाच्या जोडीचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले, तर चिराग बरेठा व मंदीप काwर या हिंदुस्थानी जोडीला कांस्यपदक मिळाले.

Comments are closed.