पाकिस्तान बनवतंय थेट अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका गुप्तपणे अणुयुक्त इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करत आहे. पाकिस्तानचे आण्विक मिसाईल थेट अमेरिकेपर्यंत मारा करू शकते. अमेरिकन पत्रिका ‘फॉरेन अफेयर्स’मध्ये ही धक्कादायक माहिती प्रकाशित झाली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान चीनच्या मदतीने आपले आण्विक सामर्थ्य वाढवायच्या प्रयत्नात आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकन अधिकार्यांचा हवाला देऊन असेही म्हटलंय की जर पाकिस्तानने जर अमेरिकेपर्यंत पोचणारे अणु मिसाईल बनवेल तर पाकिस्तानला आण्विक शत्रू घोषित करण्याशिवाय अमेरिकेकडे दुसरा पर्याय नसेल. असा देश अमेरिकेचा मित्र होऊ शकत नाही.

  • पाकिस्तान दीर्घकाळापासून दावा करतंय की त्यांचा आण्विक कार्यक्रम फक्त हिंदुस्थानला रोखण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांनी केवळ छोटय़ा आणि मध्यम पल्ल्याच्या मिसाईलवर लक्ष केंद्रीत केलंय.
  • इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल 5500 किमीपेक्षा जास्त लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहेत.

Comments are closed.