ट्रम्प तोंडावर आपटले! इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला फसला; युरेनियमचा साठा सुरक्षित, पेंटागॉनचा गुप्त अहवाल फुटला!
इराणचे अणुऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करून आम्ही ध्येय साध्य केल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अक्षरशः तोंडावर आपटले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण दलाचे मुख्यालय असलेल्या ‘पेंटागॉन’च्या अहवालानेच ट्रम्प यांना खोटे पाडले आहे. हा अहवाल लीक झाला असून त्यानुसार अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेले हल्ले लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या हल्ल्यानंतरही इराण आपला आण्विक कार्यक्रम सहज सुरू ठेवू शकणार आहे.
इराणने आण्विक कार्यक्रम हाती घेतला असून त्यापासून जगाला धोका असल्याचा कांगावा करत इस्रायलने 12 जून रोजी इराणवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणने थेट युद्धच पुकारले. इस्रायलला पडद्यामागून फूस लावणाऱया अमेरिकेनेही या युद्धात उडी घेत इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. आमच्या हल्ल्यात इराणचे सर्व अणुऊर्जा प्रकल्प नष्ट झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, तो साफ चुकीचा असल्याचे पेंटागॉनच्या अहवालातून पुढे आले आहे. इराणविरुद्धच्या युद्धाचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला होता.
डॅडिन इराण-एस्क्रल वॉर थांबला!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचा वारंवार दावा करणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवले, असा दावा आता नाटोचे प्रमुख मार्क रुटे यांनी केला आहे. कधी कधी दोन मुलांचे भांडण थांबवण्यासाठी डॅडींना ओरडावेच लागते, असे रुटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या दबावामुळे अखेर नाटोमधील 32 नेत्यांनी संरक्षणावरील खर्च वाढवण्याला मंजुरी दिली आहे.
इराण इराणी थांबत नाही! अटक करण्याव्यतिरिक्त इस्राएलच्या चरणातील तीन जण त्याच्याविरूद्ध लढले गेले
पेंटागॉनच्या अहवालात काय?
‘इराणच्या अणुकेंद्रांवरील अमेरिकेचा हल्ला तितकासा यशस्वी ठरलेला नाही. या हल्ल्यामुळे इराणच्या प्रकल्पाचे थोडेफार नुकसान झाले आहे. ते पूर्णपणे उद्ध्वस्त वगैरे झालेले नाहीत. अमेरिकेने हल्ला करण्याआधीच इराणने आपले युरेनियमचे साठे गुप्त ठिकाणी हलवले होते. ते अणुबॉम्ब बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे काही महिन्यानंतर इराण पुन्हा आपला आण्विक कार्यक्रम सुरू करू शकेल,’ असे पेंटागॉनने म्हटले आहे.
इराणमध्ये जल्लोष
इराणने हल्ले सुरूच ठेवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर केली. त्यानंतर इराणमधील जनतेने सर्वोच्च नेते खामेनी यांचे फोटो झळकावत एकच जल्लोष केला.
काय म्हणाले होते ट्रम्प?
‘इराणच्या नतान्झ, फोर्दो आणि इस्फाहान अणुकेंद्रांवर आम्ही केलेले हल्ले कमालीचे यशस्वी झाले आहेत. या हल्ल्यात इराणची अणुकेंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. आता पुढची अनेक दशके इराणला आण्विक प्रकल्प राबवता येणे शक्य नाही,’ असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
Comments are closed.