शमीच्या प्रेमात हसीन जहाँ पुन्हा! 7 वर्षांनंतर मोहम्मद शमीसाठी गायले 'हे' सुपरहिट गाणे! पहा VIDEO

मोहम्मद शमी आणि हसीन जहान- मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ गेल्या सुमारे 7 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतीच हसीन जहाँच्या पोटगी याचिकेवर सुनावणी करताना भारतीय क्रिकेटपटू शमीला आदेश दिला की, त्याने आपली पत्नी आणि मुलीला दरमहा 4 लाख रुपये पोटगी द्यावी. यावर प्रतिक्रिया देताना हसीन जहाँने म्हटले होते की, 4 लाख रुपयांची पोटगी कमी आहे. परंतु आता तिने एक व्हिडिओ आणि त्यासोबत एक मोठा संदेश शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे शमीवरील प्रेम दिसून येत आहे.

हसीन जहाँने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘प्यार में होता है क्या जादू’ हे गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे ‘पापा कहते हैं’ या 1996 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील आहे. त्यावेळी स्टार गायक कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी हे सुपरहिट गाणे गायले होते.

हसीन जहाँने या व्हिडिओ क्लिपसोबत एक मोठा संदेश शेअर केला, ज्यामध्ये तिने मोहम्मद शमीसाठी ‘आय लव्ह यू’ असेही लिहिले. तिने लिहिले की, शमीसोबत तिचा कायदेशीर संघर्ष 7 वर्षांपासून सुरू आहे, ज्यातून कोणालाही काहीही मिळाले नाही. तिने आपल्या पोस्टमध्ये ‘चारित्र्यहीन’, ‘लोभी’ आणि ‘अहंकार’ यांसारख्या शब्दांचाही वापर केला.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचे 2014 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 4 वर्षांनंतर, मार्च 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमी आणि त्यांच्या कुटुंबावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप लावले होते. (Allegations of physical and mental harassment) शमीवर खुनाचा प्रयत्न घरगुती हिंसाचार आणि विष देण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. पण, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता, परंतु बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने चौकशीनंतर भारतीय वेगवान गोलंदाजाला मॅच फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट दिली होती.

Comments are closed.