सेवानिवृत्त अधिका officer ्याने गोळ्या घालून ठार मारले, बायको जखमी
अमृतसर:
पंजाबच्या अमृतसर येथे घरगुती भांडणानंतर एका पित्याने स्वत:चा पुत्र, पत्नी आणि सूनेवर गोळीबार केला. या गोळीबारात मुलाला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित गोळीबार करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. सीआरपीएफचे निवृत्त डीएसपी तरसेम सिंह असे गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव आहे. परिवारात वैवाहिक आणि संपत्ती वाद सुरू होता. हा वाद वाढल्याने तरसेम सिंह यांनी स्वत:च्या कुटुंबीयांवरच गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून लवकरच याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर या घटनेमुळे अमृतसरमध्ये खळबळ उडाली आहे. तरसेम सिंह हे कौटुंबिक वादानंतर तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्थानकात गेले होते. त्यानंतर तरसेम आणि त्यांच्या पुत्राचे पोलीस स्थानकाबाहेरच भांडण झाले होते. घरी पोहोचल्यावर तरसेम यांनी पिस्तूल हातात घेत कुटुंबीयांवर गोळीबार केला होता.
Comments are closed.