बिना बुमराह सिराज जास्त घातक? आकडेवारी सांगते धक्कादायक सत्य!
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत इंग्लिश फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. विशेषत: मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घाम फोडला. त्याने एकट्याने 6 बळी घेतले, तर आकाश दीपच्या खात्यात 4 विकेट्स गेल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने जबाबदारीने पेस बॉलिंगची धुरा सांभाळली आणि इंग्लिश फलंदाजीची कोंडी केली.
जेव्हा प्रसिद्ध कृष्णा, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर प्रभाव पाडू शकत नव्हते, तेव्हा सिराजने मोर्चा सांभाळत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले.
दरम्यान, आता मोहम्मद सिराजविषयी एक आश्चर्यजनक विक्रम समोर आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सिराज फारसा प्रभावी दिसला नव्हता आणि त्याला केवळ 2 बळी मिळाले. त्याच सामन्यात बुमराहने 5 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या कामगिरीची तुलना सिराजशी होत होती. अनेकांनी म्हटलं की, बुमराहसोबत सिराज ‘साइड हीरो’सारखाच असतो.
पण आकडेवारी सांगते की, सिराजची कामगिरी बुमराहच्या अनुपस्थितीत अधिक प्रभावी ठरते. बुमराहसोबत 44 डावांमध्ये त्याचा बळी मिळवण्याचा सरासरी दर 33.82 आहे, तर बुमराहशिवाय खेळलेल्या 26 डावांमध्ये त्याचा सरासरी दर 25.21 इतका आहे. म्हणजेच कमी धावा देत अधिक बळी मिळवले आहेत.
मोहम्मद सिराजने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्याने 38 टेस्ट सामन्यांत 108 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा सरासरी दर 30.71 आहे आणि त्याने 4 वेळा 5 किंवा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
Comments are closed.