Live – आवाज मराठीचा! ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी माय मराठीचे वारकरी एनएससीआय डोममध्ये दाखल

‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज आज मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी वाजतगाजत, गुलाल उधळत, विजय पताका फडकावत मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
-
भगवे फेटे व हातात विजयाची गुढी घेऊन मराठी प्रेमी एनएससीआय डोममध्ये दाखल
भगवे फेटे व हातात विजयाची गुढी घेऊन मराठी प्रेमी एनएससीआय डोममध्ये दाखल #Uddhaththackeray #Rajthackeray pic.twitter.com/ijkmvhhh9wg
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 5 जुलै, 2025
- वाजत गाजत गुलाल उधळत मराठी प्रेमी डोममध्ये दाखल
- Photo – वरळीतील एनएससीआय डोम खचाखच भरले, मराठीप्रेमींची तुफान गर्दी
Photo – वरळीतील एनएससीआय डोम खचाखच भरले, मराठीप्रेमींची तुफान गर्दी pic.twitter.com/ookziuj21m
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 5 जुलै, 2025
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत मेळाव्यास्थळी दाखल
- एनएससीआय डोमबाहेर मराठीप्रेमींची तुफान गर्दी
- एनएससीआय डोमममधील मेळाव्याची तयारी पूर्ण
Photo – मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी वरळी सज्ज, मेळाव्यास्थळी तयारी पूर्णhttps://t.co/ecuhcjrjgg
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 5 जुलै, 2025
- वरळीतील एनएससीआय डोममध्ये महाराष्ट्रातून आलेल्या माय मराठीच्या वारकऱ्यांची गर्दी
Comments are closed.