राज ठाकरे, उदव ठाकरे: मफलर, गॉगल, पांढरा सदर; राज ठाकारचा लुक पाहा

राज ठाकरे, उदव ठाकरे: मफलर, गॉगल, पांढरा सदर; राज ठाकारचा लुक पाहा

राज ठाकरे आणि उदव ठाकरे रॅली: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोमच्या परिसरामध्ये अभूतपूर्व गर्दी झाली आहे. आज (5 जुलै) सकाळी साडेदहा वाजता वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्याला वेळ देण्यात आली होती. मात्र दोन तास आधीच वरळी डोम हाऊसफुल्ल झाला. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला महाराष्ट्रातून प्रचंड अशी मराठी सॅल्युट देण्यात आली आहे अशी चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या होणाऱ्या मेळाव्याकडे फक्त राज्याचे लक्ष नसून अवघ्या देशाचे लक्ष आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव यांच्यात मनोमिलन हे कायमस्वरूपी होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
डोम फुल्ल झाल्यानंतर गेटवरती सुद्धा अभूतपूर्व अशी गर्दी जमली होती. कोणत्याही परिस्थितीत आत जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड दिसून येत होती. गर्दीला सावरण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना गेटवरती जावं लागलं. त्यावेळी मुंबईचे माजी महापौर सुद्धा या गर्दीमध्ये अडकले होते. इतकेच नव्हे तर मनसे नेते, शिवसेना नेत्यांना वरळी डोममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. इतकी अभूतपूर्व गर्दी गेटवर जमली होती. त्यामुळे गर्दीला नाराज न करता बाळा नांदगावकर यांनी पोलिसांशी चर्चा करून आत सोडण्याची विनंती केली. यानंतर गर्दी थेट डोमच्या दिशेने आत गेली. या गर्दीवरूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचा अंदाज येऊ शकतो. गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले. दुसरीकडे, वरळी डोम परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Comments are closed.