कसोटी आणि वनडेत विराट-रोहितमध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर
विराट कोहली वि रोहित शर्मा: भारताचे दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अलिकडेच टी20 आणि कसोटी फाॅरमॅटला अलविदा म्हटले आहे. दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे फाॅरमॅटमध्ये खेळताना दिसतील. दरम्यान क्रिकेट चाहत्यांमध्ये नेहमीच एक प्रश्न चर्चेत असतो की, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये कोण अधिक चांगला फलंदाज आहे? विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दोन मजबूत स्तंभ आहेत. एकाला ‘रन मशीन’ म्हटले जाते, तर दुसरा ‘हिटमॅन’ नावाने ओळखला जातो. दोघांनीही भारतीय संघासाठी अगणित अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
हे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे सामने खेळताना दिसतील, पण जेव्हा आकडेवारीची गोष्ट येते, तेव्हा कोण कोणाच्या पुढे आहे? चला तर मग जाणून घेऊयात की, वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये विराट की रोहित कोणाच्या बॅटमधून अधिक धावा निघाल्या आहेत. (Virat Kohli vs Rohit Sharma comparison)
विराट कोहलीची वनडे कारकिर्द अत्यंत शानदार राहिली आहे. आतापर्यंत त्याने 302 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 290 डावांमध्ये 14,181 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 57.88 आहे, जी कोणत्याही क्रिकेटपटूसाठी स्वप्नवत असते. विराटने वनडेमध्ये 51 शतकांसह 74 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे. (Virat Kohli ODI stats)
तर रोहित शर्माने आतापर्यंत 273 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात 265 डावांमध्ये त्याने 11,168 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 47.77 आहे, आणि स्ट्राइक रेटही 92.81 च्या आसपास आहे. रोहितच्या नावावर 32 शतके आणि 58 अर्धशतके आहेत. मात्र, रोहितच्या नावावर वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या 264 धावा आहे. (Rohit Sharma ODI Stats)
आकडेवारीनुसार पाहिले तर, विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मापेक्षा खूप पुढे आहे. विराट कोहली रोहितपेक्षा सुमारे 3,000 धावा आणि 19 शतके पुढे आहे. (Virat Kohli is ahead of Rohit Sharma in ODIs)
कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि 210 डावांमध्ये 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी 46.85 आहे. त्याच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 धावा आहे. (Virat Kohli Test Stats)
तर रोहित शर्माने 67 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 116 डावांमध्ये त्याने 4,301 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी सुमारे 40.58 आहे. रोहितने कसोटीत 12 शतकांसह 18 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 धावा आहे. (Rohit Sharma Test Stats)
येथेही विराटचा अनुभव आणि सातत्य स्पष्टपणे दिसून येते. त्याने रोहितपेक्षा जवळपास दुप्पट धावा केल्या आहेत आणि शतकेही अडीच पट जास्त झळकावली आहेत. त्यामुळे वनडे आणि कसोटी या दोन्ही फाॅरमॅटमध्ये रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीचे वर्चस्व जास्त आहे. (In Test and ODI formats, Virat Kohli is ahead of Rohit Sharma)
Comments are closed.