बहुतेक भारतीय लोकशाहीवर समाधानी आहेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील लोकशाहीच्या संदर्भात भारतातील 74 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे, असा निष्कर्ष प्यू रिसर्च नामक जागतिक कीर्तीच्या सर्वेक्षण संस्थेने प्रसिद्ध केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे धनाढ्या आणि बलवान देशांमधील नागरीकांनी लोकशाही व्यवस्थेसंबंधी असमाधान व्यक्त केले आहे.
भारतात लोकशाहीविषयी लोकांमध्ये कोणतीही अनास्था दिसून येत नाही. भारतातील लोकांना लोकशाहीच हवी असून या राज्यव्यवस्थेच्या माध्यमातूनच देशाची आणि समाजाची प्रगती होऊ शकेल, असे बव्हंशी भारतीयांना वाटते. त्यामुळे भारतात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत, हे दिसून येते. भारतात लोकशाही व्यवस्थेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही, हे देखील भारतीय नागरीकांनी दर्शविलेले आहे, असे या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.