निरव मोदींच्या भावाने आमच्यात अटक केली
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीचा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या अटकेची पुष्टी केली आहे. निहालच्या जामिनावर 17 जुलै रोजी नॅशनल डिस्ट्रिक्ट ऑफ होनोलुलु (एनडीओएच) येथे सुनावणी होणार आहे. निहाल मोदीवर अमेरिकेतील एलएलडी डायमंड्ससोबतच्या फसवणुकीव्यतिरिक्त 13,600 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. सध्या मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कट या दोन महत्त्वाच्या आरोपांवर निहाल मोदीवर कारवाई करण्यात आली आहे.
भारताच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) निहालच्या प्रत्यार्पणासाठी अपील केले होते. आता त्याच्या अटकेनंतर भारतीय तपास यंत्रणा कोणता पवित्रा घेतात हे पहावे लागेल. यापूर्वी ईडी आणि सीबीआयच्या तपासात निहालने नीरव मोदीला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून बेकायदेशीर पैसे हडपण्यात निहालचाही सहभाग उघड झाला आहे.
अटकेची कारवाई कशी झाली?
2019 मध्ये इंटरपोलने निहालविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्याचा शोध जागतिक स्तरावर सुरू झाला होता. तो अमेरिकेत असल्यामुळे 2021 मध्ये सीबीआय आणि ईडीने अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. अलीकडेच, भारताच्या विनंतीवरून अमेरिकन अधिकाऱ्यांनी निहालला अटक केली. ही अटक होनोलुलुमध्ये झाली आहे.
Comments are closed.