आयआयटीतील आत्महत्या प्रकरण; अरमान खत्रीविरोधात अखेर खटला चालणार

पवई आयआयटीतील विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी अरमान खत्रीविरोधात अडीच वर्षांनंतर खटला चालणार आहे. अरमानने गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर तक्रारदार व सरकारने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अरमानने याचिकाच मागे घेतली. त्यामुळे त्याच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला.

फेब्रुवारी 2023 मध्ये दर्शन सोलंकीने आयआयटी पॅम्पसमधील वसतिगृह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या खोलीत चिठ्ठी सापडली होती. त्याआधारे पोलिसांनी अरमानला अटक केली होती. या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी अरमानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका मागे घेतल्यामुळे अरमानविरोधात सत्र न्यायालयात खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सालसिंगिकर यांनी दिली.

Comments are closed.