कोल्हापुरी चप्पलचा वाद हायकोर्टात

800 वर्षे जुन्या कोल्हापुरी चप्पलची डिझाईन विनापरवाना वापरण्यास कंपन्यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पाच वकिलांनी ही जनहित याचिका केली आहे. कोल्हापुरी चप्पलला भौगोलिक महत्त्व असून तशी त्याची अधिकृत नोंदणी झाली आहे. मात्र एका आंतरराष्ट्रीय कंपनीने हुबेहूब कोल्हापुरी चप्पलसारखी चप्पल बाजारात आणली आहे. या चप्पलची किंमत तब्बल एक लाख रुपये आहे. हिंदुस्थानसह आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातल्या कोल्हापुरी चप्पलचा लौकिक आहे. तरीही कोणतीही परवानगी न घेता या आंतरराष्ट्रीय कंपनीने कोल्हापुरी चप्पलसारखी चप्पल बनवली. त्यामुळे या कंपनीने जाहीर माफी मागावी. याची नुकसानभरपाई द्यावी, विनापरवाना कोल्हापुरी चप्पलसारखी चप्पल बनविणाऱया प्राडा कंपनीवर कारवाई करावी, या कंपनीला विनापरवाना डिझाईन वापरण्यास मनाई करावी अशा मागण्या याचिकेत केल्या आहेत.

Comments are closed.