टेक्सासमध्ये महापूर; 51 मृत्यू, हवामान खात्याचा अंदाज चुकला

अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अचानक महापूर आला. त्यात तब्बल 51 लोकांचा बळी गेला असून ग्वाडालुपे नदीला पूर आल्याने भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. मृतांमध्ये 15 लहान मुलांचा समावेश असून अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. ग्वाडालुपे नदीच्या आजूबाजूच्या भागात कमी वेळात तुफान पाऊस झाला.
एका महिन्यात जितका पाऊस होतो तितका पाऊस अवघ्या काही तासांत झाला. त्यामुळे नदीची पातळी तब्बल 29 फुटांनी वाढली असून आसपासच्या परिसरातही पाणी शिरले. हवामान खात्याचे माजी प्रमुख रिक स्पिनराड यांनी सांगितले की, सरकारने हवामान विभागातील अनेकांना कामावरून काढले आहे. काही कार्यालयांत कर्मचारीच नाहीत. परिणामी वेळेवर पुराचा अंदाज देता न आल्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने केवळ मध्यम पावसाचा इशारा दिला होता, परंतु अतिवृष्टी झाली. इतका मुसळधार किंवा तुफान पाऊस पडेल याचा अंदाज हवामान खात्यालाही नव्हता. त्यामुळे नागरिकांना वेळेत सावध करता आले नाही, असेही सरकारने नमूद केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपत्ती जाहीर करण्याची विनंती केली आहे. या घोषणेमुळे सरकारकडून पूरग्रस्तांना मदत मिळू शकते, असे टेक्सासचे राज्यपाल ग्रेट अॅबॉट यांनी सांगितले.
Comments are closed.