हो, मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो; 26/11 चा हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा पोपटासारखा बोलू लागला, केले मोठे गौप्यस्फोट

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा आता पोपटासारखा बोलू लागला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचसमोर तहव्वूर राणा याने अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीमध्ये झालेल्या चौकशी दरम्यान राणाने आपण पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो अशी कबुली दिली. तसेच आखाती युद्धा दरम्यान आपल्याला सौदी अरबमध्ये पाठवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. ‘भारत आज‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

एनआयए चौकशीदरम्यान तहव्वूर राणा याने आपण पाकिस्तानी सैन्याचे विश्वासू एजंट होतो अशी कबुली दिली. तसेच त्याने त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासोबत पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाच्या अनेक ट्रेनिंग सेशमध्ये भाग घेतल्याचीही कबुली दिली. एवढेच नाही तर लश्कर-ए-तोएबा ही फक्त दहशतवादी संघटना नसून ती गुप्तहेर संघटनेसारखी काम करते, असा गौप्यस्फोटही राणाने केला.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.