ट्रम्प यांचा पहिला घाव जपान आणि कोरियावर, भल्या मोठ्या आयात शुल्काची नोटीस, BRICS देशांना इशारा
यूएस दर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणाऱ्या नव्या टॅरिफ दरांची म्हणजे आयात शुल्काची घोषणा केली आहे. ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन पानी पत्र शेअर करत त्यांनी जपान आणि दक्षिण कोरियावर 25 आयात शुल्क लागू करण्याची माहिती दिली. या दोन्ही देशांनी जर अमेरिकेत उत्पादन सुरू केलं तर त्यांच्यावर कर लावणार नाही असंही ट्रम्प यांनी घोषित केलं.
ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर जपान किंवा दक्षिण कोरिया यांनी प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर आयात शुल्क लावले, तर अमेरिकाही आपले दर पाच टक्क्यांनी अधिक वाढवेल. तुम्ही जेवढे आयात शुल्क वाढवाल तेवढेच शुल्क आम्ही 25 टक्क्यांवर वाढवू असा इशारा ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अध्यक्षपद मिळाल्यानंतर व्यापारात ‘America First’ धोरण अधिक आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला मोठे आयात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेने ते 90 दिवसांसाठी स्थगित केले आणि सर्व देशांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर आता अमेरिकडून 12 देशांवर नवीन आयात शुल्क लावण्यात आले आहेत.
ब्रिक्स देशांनाही इशारा
ट्रंप यांनी ब्रिक्स गटातील (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि नव्याने सामील देश) राष्ट्रांना देखील इशारा दिला आहे की, अमेरिकाविरोधी धोरणे स्वीकारल्यास त्यांच्यावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्यात येईल.
भारतावर सध्या नवीन आयात शुल्क नाही
भारतावर सध्या ट्रम्प सरकारने थेट आयात शुल्क लावलेले नाहीत, पण ब्रिक्स संदर्भात अप्रत्यक्ष इशारा दिला गेला आहे. दोन्ही देश व्यापार भागीदार असल्याने, आगामी काही महिन्यांत चर्चेचा क्रम वाढू शकतो. भारत सध्या अमेरिकेशी व्यापार संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातून फार्मा, आयटी, आणि इंजिनिअरिंग उत्पादने मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात केली जातात.
12 देशांना आयात शुल्काबाबत पत्र
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नव्या आयात शुल्कासंबंधी 12 देशांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये या देशांवर लावण्यात आलेल्या नव्या आयात शुल्काची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेकडून लावण्यात आलेले नवे आयात शुल्क हे देश स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
Donald Trump Tarrif : ट्रम्प यांच्या घोषणेतील महत्त्वाचे मुद्दे
- ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन टॅरिफ दर लागू करण्याची घोषणा केली.
- जपान आणि दक्षिण कोरियावर 25 टक्के आयात शुल्क लागणार.
- ट्रम्प यांनी दोन्ही देशांना अमेरिकेतच उत्पादन सुरू करण्याचा सल्ला दिला.
- अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग केल्यास टॅरिफमुक्त सवलत.
- जपान किंवा दक्षिण कोरियेकडून टॅरिफ वाढवल्यास ट्रम्प त्यात 5 टक्के वाढ करतील.
- ट्रम्प यांनी हे पत्र 12 देशांना पाठवलं, टॅरिफ दर ‘नॉन-नेगोशिएबल’ असल्याचे स्पष्ट.
- हे पत्र मूळतः 4 जुलैला प्रसिद्ध होणार होतं, पण ते 7 जुलैला प्रसिद्ध करण्यात आलं.
- ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिला 10 टक्के अतिरिक्त शुल्काचा इशारा.
- ब्रिक्समध्ये आता ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, यूएई आणि इंडोनेशियाचा समावेश.
- ट्रम्प यांच्या निर्णयाचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता.
आणखी वाचा
Comments are closed.