शेख शाहजहानविरूद्ध सीबीआय एफआयआर
कोलकाता:
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे 2019 मध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी सीबीआयने शेख शाहजहां विरोधात अधिकृत स्वरुपात एफआयआर नोंदविला आहे. हे प्रकरण भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या (प्रदीप मंडल, देवदास मंडल आणि सुकांत मंडल) हत्येशी संबंधित आहे. हे तिन्ही कार्यकर्ते लोकसभा निवडणूक 2019 च्या हिंसेदरम्यान मारले गेले होते. याप्रकरणी प्रारंभिक तपास राज्य पोलिसांकडून करण्यात आला होता. परंतु पीडित परिवारांनी न्यायालयात धाव घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शेख शाहजहां सध्या संदेशखाली येथील हिंसेप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांच्या तपासात गंभीर निष्काळजीपणा दिसून आला आहे. तसेच मुख्य आरोपीला आरोपपत्रातून अवैध स्वरुपात वगळण्यात आल्याचे म्हणत कलकत्ता उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
. पीडित परिवार आणि सर्वसामान्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी आता याप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविला जात असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
Comments are closed.