ब्रायन लाराचा विक्रम मोडू नये म्हणून 367 धावांवर नाबाद राहिला अन् डावही घोषित केला; कोण आहे द.

Wiaan mulder: एका कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेल्या 21 वर्षांपासून वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याच्या नावावर आहे. त्यानंतर अनेक खेळाडूंनी 300 धावांचा टप्पा ओलांडला, परंतु लाराचा विक्रम मोडू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर हा ऐतिहासिक विक्रम मोडू शकला असता, परंतु त्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने डाव घोषित केला. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने 626 धावा केल्या. वियानने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विक्रमी कामिगरी केली.

दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 626 धावा केल्या होत्या. वियान मुल्डरने 367 धावा केल्या होत्या आणि ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 33 धावांची आवश्यकता होती. पण लंचब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकन संघ पुन्हा खेळायला न येता 626 धावांवर पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे वियान मुल्डर स्वत: दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार असल्यामुळे त्याला 400 धावा करण्याची संधी होती. मात्र त्याने डाव घोषित केल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील वियान मुल्डरचे दुसरे सर्वात जलद त्रिशतक-

दरम्यान वियान मुल्डर दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. याआधी एका डावात 311 धावा करणाऱ्या दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम आमलाच्या नावावर हा विक्रम होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील वियान मुल्डरचे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे, मुल्डरने 297 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. सर्वात जलद त्रिशतकाचा विक्रम भारताच्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे, ज्याने 278 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले.

वियान मुल्डरची कारकीर्द-

वियान मुल्डर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. 2019 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. 2021 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-20 पदार्पण केले. झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने कर्णधार म्हणून 300 धावांचा टप्पा ओलांडला आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला. मुल्डरने 297 चेंडूंमध्ये त्रिशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 49 चौकार आणि 4 षटकार लगावले, असे वृत्त आहे. या कामगिरीमुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा 29 वा खेळाडू ठरला आहे.

राज्यासह देशातील महत्वाचा घडामोडी, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Akash Deep: 6 महिन्यात वडील आणि भावाला गमावलं, 10 विकेटचं यश कॅन्सरशी झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित, कोण आहे आकश दीप?

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील; भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.