पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बैठक

पीएमजीपी (पंतप्रधान गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत लोकप्रतिनिधी, समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मुंबादेवी, कुलाबा व इतर भागात पीएमजीपीच्या 66 इमारती बांधल्या होत्या. 180 चौरस फुटांची घरे बांधली होती. आता इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 125 कोटी रुपये दिले होते. मागच्या वर्षीही सरकारने या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी दिला होता. नव्याने निधी कधी देणार, असा सवाल अमीन पटेल यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुनर्विकासाच्या संदर्भात बैठक बोलावण्याचे निर्देश सरकारला दिले.
Comments are closed.