वनप्लसच्या ताफ्यात नवी भर! Nord 5, CE 5 आणि Buds 4 दमदार फीचर्ससह लाँच, किंमत ऐकून थक्क व्हाल!

टेक न्यूज: लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने आपल्या Nord सिरीजमध्ये तीन नव्या उपकरणांची घोषणा केली आहे. वनप्लसच्या ताफ्यात आता नव्या तीन डिव्हायिसची एन्ट्री झालीय. यामध्ये Nord 5, Nord CE 5 आणि Buds 4 यांचा समावेश आहे. हे तिन्ही उपकरणे त्यांच्या श्रेणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान, जबरदस्त कामगिरी आणि आकर्षक डिझाइनसह सादर करण्यात आली आहेत. अनेक उत्तम फिचर्ससह किमतीतही किफायतशीर असणाऱ्या वनप्लसच्या या डिव्हायिसबद्दल सर्व माहिती जाणून घ्या..

ताकदवान प्रोसेसर आणि 4K कॅमेरा

OnePlus Nord 5 मध्ये Snapdragon 8s Gen 3 हा शक्तिशाली प्रोसेसर असून त्यात 12 GB RAM आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. यामध्ये 6.83 इंचाचा Full HD AMOLED डिस्प्ले असून 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. कॅमेरासंबंधी, यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा आहे. हे तिन्ही कॅमेरे 4K 60fps व्हिडिओ शूट करू शकतात. फोनमध्ये in-display फिंगरप्रिंट सेन्सर, NFC, Bluetooth 5.4 आहे. बॅटरी 6800 mAh ची असून 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग आहे.

बजेटमध्ये दमदार फोन

Nord CE 5 मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर असून त्यासोबत 12 GB RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. यात 6.77 इंच AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. बॅटरी 7100 mAh ची असून 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.कॅमेरासाठी, यात 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये Bluetooth 5.4 आहे, पण NFC नाही.

किंमत किती? कुठे मिळणार?

किंमत आणि उपलब्धतेच्या दृष्टीने, OnePlus Nord 5 ची प्रारंभिक किंमत ₹31,999 इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र निवडक बँक कार्ड्सवरील सवलतीनंतर या फोनची किंमत ₹29,999 इतकी आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB RAM आणि 512GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ₹35,999 इतकी आहे. हा फोन Marble Sands, Phantom Grey आणि Dry Ice या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार असून, त्याची विक्री 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

दुसरीकडे, OnePlus Nord CE 5 चं बेस मॉडेल (8GB RAM आणि 256GB स्टोरेज) ₹24,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आलं आहे. ऑफरनंतर याच मॉडेलची किंमत ₹22,999 इतकी असेल. याच मालिकेतील टॉप व्हेरिएंट (12GB RAM आणि 256GB स्टोरेज) ₹26,999 रुपयांना उपलब्ध होईल. हा फोन Nexus Blue, Black Infinity आणि Marble Mist या रंगांमध्ये मिळेल. Nord CE 5 ची विक्री 12 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजता सुरू होईल. तसेच, OnePlus Buds 4 इयरबड्सची मूळ किंमत ₹6,000 असून, सवलतीनंतर ती ₹5,499 इतकी आहे. हे बड्स देखील 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होतील.

हेही वाचा:

AI Cutdown Jobs Amazon: एआयमुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर गंडांतर, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, सीईओंचा इशारा

आणखी वाचा

Comments are closed.