दिल्लीला इम्फल परत येण्यासाठी इंडिगो फ्लाइट

नवी दिल्ली : मणिपूरची राजधानी इंफाळ येथे जात असलेले इंडिगोचे विमान गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे एक तास आकाशात फिरत राहिल्यावर नवी दिल्लीतील विमानतळावर उतरले आहे. दिल्लीहून इंफाळच्या दिशेने जाणाऱ्या विमानात उड्डाणानंतर एका तांत्रिक बिघाडाबद्दल कळले होते. खबरदारीदाखल वैमानिकांनी विमान परत नवी दिल्ली विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरल्याचे इंडिगो एअरलाइन्सकडून सांगण्यात आले. अनिवार्य प्रक्रियेनुसार विमानाची आवश्यक तपासणी करण्यात आली. यानंतर त्वरित प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला. प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करत असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर देशातील सर्व एअरलाइन्स आता विमानप्रवासाविषयी अधिक खबरदारी बाळगत आहेत. विमानाची पूर्ण तपासणी करूनच उड्डाण घडवून आणले जात आहे.

Comments are closed.