विद्रन भवन राजकिया नाटक, मध्यरात्रीच्या घटनेच्या इमारतीतून, यशद यांची थिया चळवळी

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री विधान भवनाबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर त्याचे पडसाद उमटले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आव्हाड संतापले. त्यांनी मध्यरात्री दीड वाजता विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केले. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आव्हाडांनी पोलिसांची जीप अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवे पडून आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः मागे खेचून काढले. यावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते आणि त्यांनीही देशमुखांना ताब्यात घेण्याचा निषेध केला. नितीन देशमुखांना कोणत्या पोलीस स्टेशनला नेले हे कळू शकले नाही. आव्हाडांनी प्रश्न विचारला की, “मारायला पाच जण होते. मारणारा कुठे आहे? मारणारे पाच पाच जणं मारताहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडपाव काही घेऊन जाताहेत. त्याला तंबाकू मळून काय देताहत.” त्यांनी इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करण्याची आणि पडळकर यांच्या पाच आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली. आव्हाडांना जीवे मारण्याच्या धमक्या आणि शिवीगाळ करणारे संदेश आल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.