Awhad vs Padalkar : विधानभवनाच्या गेटवर मध्यरात्री अभूतपूर्व राडा, आव्हाडांचा पोलिसांशी संघर्ष
राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन परिसरात हाणामारी झाली. या घटनेनंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आव्हाड संतापले. त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केले. आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः मागे खेचून काढले. या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते. त्यांनी मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा निषेध केला. रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विधानमंडळाच्या दोन प्रत्यक्षदर्शी पोलिसांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विधीमंडळाकडून अहवाल देण्यात आला होता. या अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. मात्र अध्यक्षांनी कडक कायदेशीर कारवाईचे संकेत दिले होते. आव्हाडांनी पोलिसांवर आरोप करत म्हटले, ‘मला मारते तुमचे पोलीस. त्याला वडापा काय घेऊन जात आहे त्याला तंबाखू म्हणून काय देतात सव्वा इंस्पेक्ट. पुढे चव्हाण. आमच्याकडे व्हिडिओ आहे दाखवतो व्हिडिओ.’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठले आणि तिथेही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आंदोलन केले. आव्हाडांना ‘तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो’ अशा धमक्या आल्याचेही समोर आले आहे. एका व्यक्तीने विनापास आत येऊन आव्हाडांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र नितीन देशमुखवर हल्ला झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Comments are closed.