Maharashtra Assembly Clash | Vidhan Bhavan मध्ये राडा, Awhad-Padalkar समर्थकांमध्ये हाणामारी
लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या विधानभवनात कालचा दिवस गालबोट लावणारा ठरला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा घातला. एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी केली. गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे हे समर्थक विधानभवनात घुसले होते. या राड्याला गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील बुधारश वादाची पार्श्वभूमी होती, ज्यात गाडीचा दरवाजा लावण्यावरून शिवीगाळ झाली होती. या घटनेनंतर मध्यरात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे थिया आंदोलन केले. आव्हाड यांना ‘तुला बघतोच, तुला मर्डरच करतो’ अशा धमक्या मिळाल्या होत्या. आव्हाड सापडले नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला झाल्याचेही नमूद करण्यात आले. विधानसभा अध्यक्षांनी या घटनेनंतर कठोर पाऊले उचलली आहेत. विधानभवन सुरक्षा कार्यालयाने परिसरात कठोर नियमावली लागू केली आहे. आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पीएना प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.
Comments are closed.