बौद्ध भिक्षूंना सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं, नंतर गर्भवती असल्याचा बनाव रचत कोट्यवधीची फसवणूक

थायलंड भिक्षू सेक्स ब्लॅकमेलिंग घोटाळा: थायलंडमध्ये घडलेल्या एका खळबळजनक लैंगिक घोटाळ्याची सध्या जगभरात चर्चा आहे. यात एका महिलेने बौद्ध भिक्षुंसोबत शारीरिक संबंध  बौद्ध ठेवत तब्बल 104 कोटी रुपये उकळले असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणात 35 वर्षीय मुख्य आरोपी म्हणून विलावन अम्सावतला अटक करण्यात आली आहे. ती ‘सिका मिस गोल्फ’ किंवा ‘मिस गोल्फ’ म्हणून देखील ओळखली जाते. या प्रकरणी विलावनने बौद्ध भिक्षूंचे फोटो आणि व्हिडिओ काढत तिने धमकी देऊन भिक्षूंना ब्लॅकमेल केले. कालांतराने ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेच्या घरातून तब्बल हजारो फोटो आणि व्हिडिओ सापडून आले आहेत. मात्र पवित्र आशा बौद्ध माठात घडलेल्या या घटनेमुळे सध्या थायलंडसह जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला विलावन अम्सावतलाने 2019 पासून थायलंडमधील इन्फ्लूयएन्सर आणि श्रीमंत बौद्ध भिक्षूंना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एकदा विश्वास संपादन करून तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. दरम्यान, ती एवढ्यावरच थांबली नाही तर यानंतर आपण गर्भवती असल्याचा बनाव करत ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून कोट्यवधि रुपये देखील उकळले. सोबतच या महिलेने जवळपास नऊ भिक्षूंसोबत संबंध ठेवले. गेल्या तीन वर्षांपासून ती हे कृत्य करत होती. या महिलेने भिक्षूंकडून जवळपास 104 कोटी उकळले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर महिलेने हे पैसे ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी वापरले असल्याची ही माहिती आता पुढे आली आहे.

कोण आहे सिका मिस गोल्फ?

दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी विलावन अम्सावत कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. तर विलावन अम्सावत ही 35 वर्षीय थाई महिला आहे. ती ‘सिका मिस गोल्फ’ किंवा ‘मिस गोल्फ’ म्हणून देखील ओळखली जाते.  जी या संपूर्ण घोटाळ्याची सूत्रधार मानली जाते. गेल्या तीन वर्षांपासून ती हे कृत्य करत होती. या महिलेने भिक्षूंकडून जवळपास 104 कोटी उकळले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तिला 15 जुलै 2025 रोजी बँकॉकजवळील नोंथाबुरी येथून अटक करण्यात आली. तिच्याकडे पोलिसांना 5 मोबाईल फोन मिळाले, ज्यामध्ये 5600 आक्षेपार्ह व्हिडिओ, 80 हजार फोटो आणि अनेक चॅट रेकॉर्ड्स आढळले. हे पुरावे तिचे वरिष्ठ बौद्ध भिक्षूंशी असलेले जवळचे संबंध आणि ब्लॅकमेलिंगचे कृत्य उघड करतात. याशिवाय तिच्या घरातून काही भिक्षूंचे भगवे वस्त्र देखील जप्त करण्यात आले. यातून या घटनेची तीव्रता लक्षात येऊ शकते.

हे ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.