Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी
पावसाळ्यात जशी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या घरात एखादा मोती, ब्रुनो किंवा मनीमाऊ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सततचा पाऊस, मातीतील घाण, बॅक्टेरिया आणि किटकांची वाढती संख्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारी असते. त्यामुळे आपण त्यांची या दिवसात विशेष काळजी घ्यायला हवी. मानवाप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही संसर्गजन्य आजारांचा धोका पावसाळ्यात अधिक असतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या पण सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात तुमच्या मोती, ब्रुनो किंवा मनीमाऊची नक्कीच काळजी घेऊ शकाल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाळीव प्राण्याला पावसात भिजण्यापासून वाचवावे. कारण यामुळे त्यांचे केस ओले होऊन दुर्गंध येऊ शकतो.
- ओल्या केसांमुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
- जर पावसात प्राणी भिजलेच तर घरी आल्यावर त्यांना टॉवेलने कोरडे करून घ्यावे.
- गरज पडल्यास तुम्ही ड्रायरचा वापर करू शकता.
- या दिवसात पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे पदार्थ जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
- नेहमी ताजे अन्नपदार्थ त्यांना खायला द्या.
- पाणी उकळूनच द्या कारण दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होऊ शकतात.
- दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांची जेवणाची-पाण्याची भांडी स्वच्छ करावी.
- बागेत फिरायल्या नेल्यावर या दिवसात कीटक त्यांच्या पायांना चिकटू शकतात. हे कीटक त्यांच्या पायावाटे घरात येऊ शकतात.
- बाहेरून घरी आणल्यावर त्यांचे पाय अवश्य स्वच्छ करा.
- नखे आणि पंजे स्वच्छ ठेवा.
- पावसाळ्यात आर्द्रता वाढते. त्यामुळे त्यांची बसण्याची जागा ओली होऊ शकते. अशावेळी त्यांची बसण्याची जागा कोरडी आहे का नाही, हे नक्की तपासा.
- अंथरूण स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
- आठवड्यातून किमान एकदा प्राण्याचे अंथरूण धुवावे.
- पूर्ण वाळल्याशिवाय त्यावर त्यांना बसवू नये.
- लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यात होणारा सामान्य आजार आहे. त्यामुळे पशुवैद्यकाच्या मदतीने प्राण्याचे लसीकरण करून घ्या.
- नियमित त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घ्या.
- सर्व लसीकरण वेळेवर करा.
- कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास निष्काळजी न करता डॉक्टरकडे घेऊन जा.
हेही पाहा –
Comments are closed.