राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे – अंबादास दानवे

विधानभवनात जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवनात केली. तसेच या प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा देखील व्हायला हवी असे ते म्हणाले.

”विधानभवन हे लोकशाहीचं एक मंदिर आहे. असे असताना विधानभवनात ज्या प्रकारे माऱा माऱ्या झाल्या ते आपल्या सर्वांना लाजिरवाण्या वाटाव्या अशा आहेत. हे होत असताना विधानभवनाच्या तळममजल्यावर समर्थकांची बाचाबाची झाली. विधानभवनाच्या आतमध्ये घटना घडली. आपण या प्रांगणाचे प्रमुख आहेत. इथे कोण येतं हे पाहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. काल ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत लाजिरवाणं आहे. आपल्या सर्वांना गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच पण आता तो विधानभवनापर्यंत पोहोचला आहे”, असे दानवे म्हणाले.

Comments are closed.