IND vs ENG: रवींद्र जडेजाच्या खेळीचं प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून कौतुक! टीकाकारांना दिलं सडेतोड उत्तर

टीम इंडिया आणि इंग्लंड (Team india vs England) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मॅंचेस्टरमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सरावात व्यस्त झाली आहे. लॉर्ड्समध्ये मिळालेल्या थोडक्याच फरकाने झालेल्या पराभवाने चाहत्यांचे मन मोडले होते. हा सामना टीम इंडिया (Team india) जिंकू शकली असती, पण कदाचित नशिबातच नव्हते. मोहम्मद सिराजनेही (Mohmmed Siraj) असा कधी विचारही केला नव्हता की चांगला बचाव करूनही तो बाद होईल. त्यामुळे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुसऱ्या टोकाला उभा राहून काही करू शकला नाही. जडेजाने शेवटपर्यंत प्रयत्न करत संघाला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. तरीही त्याला काही लोकांकडून टीका सहन करावी लागली.

बीसीसीआयने ‘द एमव्हीपी फिट रवींद्र जडेजा’ अशा कॅप्शनसह एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील एक क्लिप दाखवली आहे. यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले (Head Coach Gautam gambhir), जड्डूची आव्हानात्मक खेळी खूपच जबरदस्त होती. त्याच्या या खेळीत एक चांगली जिद्द दिसून आली.

गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला (Mohmmed Shami), जडेजासारखा खेळाडू मिळणं खूप कठीण आहे. आम्ही खरोखरच नशिबवान आहोत की तो आपल्या संघात आहे. तर टीमचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक (Sitanshu Kotak) म्हणाले, मला आधीपासून वाटत होतं की, जडेजाकडे दबाव झेलण्याची क्षमता आहे. तो नेहमी अशा क्षणी चमकतो, जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज असते. जडेजा टीम इंडियासाठी खूप मौल्यवान आणि महत्त्वाचा खेळाडू आहे.

लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने नाबाद 61 धावांची दमदार खेळी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनीही त्याला चांगली साथ दिली होती. पण शोएब बशीरच्या फिरकीच्या एका चेंडूने टीम इंडियाचा डाव संपवला.

Comments are closed.