कोण नंबर-1 आणि कोण नंबर-2, आयसीसी रँकिंगमध्ये खेळाडूंचे स्थान कसे ठरते? जाणून घ्या सविस्तर

आयसीसी रँकिंगचे नियमः आयसीसी प्लेयर रँकिंग (ICC Player Ranking) ही अशी सारणी आहे, जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीच्या आधारे पॉइंट्स बेस सिस्टीमद्वारे त्यांना स्थान दिले जाते. क्रिकेट खेळाडूंना 0 ते 1000 पॉइंट्सच्या दरम्यान रेट केले जाते. जर एखाद्या खेळाडूची कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत चांगली झाली असेल, तर त्या खेळाडूचे पॉइंट्स वाढतात. तसेच, जर खेळाडूची कामगिरी पूर्वीपेक्षा खराब झाली, तर पॉइंट्स कमी केले जातात. (ICC Player Rankings)

खेळाडूंची रँकिंग कशी ठरते?
क्रिकेट खेळाडूच्या एका सामन्यातील कामगिरीची गणना करण्यासाठी एका अल्गोरिदमचा वापर केला जातो, ज्यामुळे खेळाडूची कामगिरी त्या सामन्यातील परिस्थितीनुसार मोजली जाते. या अल्गोरिदममध्ये खेळाडूने त्या सामन्यात केलेल्या धावा आणि घेतलेल्या विकेट्सचा समावेश असतो. जर खेळाडूने आपल्या संघाला तो सामना कठीण परिस्थितीत जिंकून दिला असेल, तर त्याच्या कामगिरीचे मूल्य आणखी वाढते.

आयसीसीच्या या गणना प्रक्रियेत कोणताही व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही आणि कोणत्याही खेळाडूला जास्त महत्त्व दिले जात नाही. आयसीसी ही रँकिंग प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष ठेवते. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कसोटी क्रिकेट, वनडे आणि टी20 मध्ये रँकिंग ठरवण्यासाठी वेगवेगळे घटक आहेत. आयसीसी सारणीमध्ये खेळाडूंचे स्थान रँकिंगद्वारे सांगते आणि सारणीतील रेटिंग्स खेळाडूंना मिळणारे पॉइंट्स दर्शवतात.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या आयसीसी पुरूष कसोटी गोलंदाज रँकिंगमध्ये नंबर एकवर आहे. बुमराहचे रेटिंग पॉइंट्स 901 आहेत. तर दुसऱ्या स्थानावर 851 रेटिंग पॉइंट्ससह दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा आहे. या यादीत 838 रेटिंग पॉइंट्ससह ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराह, रबाडा आणि कमिन्स यांना ही रेटिंग त्यांच्या कामगिरीनुसार दिली गेली आहे. या तिन्ही गोलंदाजांनी अनेकदा आपल्या संघांना सामने जिंकून देण्यातही योगदान दिले आहे. (Jasprit Bumrah No. 1 bowler)

जसप्रीत बुमराहने नुकतेच आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये 907 रेटिंग पॉइंट्स मिळवले, जी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाने मिळवलेली सर्वोत्तम रेटिंग आहे. (Best Rating by an Indian Bowler) यापूर्वी हा रेकाॅर्ड रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता. अश्विनला आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वोत्तम रेटिंग 904 पॉइंट्सपर्यंत मिळाली आहे. अश्विनने 18 डिसेंबर 2024 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. (R Ashwin retirement)

Comments are closed.