अजितदादांनी 12.11 वाजता कडक शब्दात सांगितले; 12.59 वाजता सूरज चव्हणांचा राजीनामाच मागितला, नेमक
सूरज चवनवरील अजित पवार: अखिल भारतीय छावा संघटनेचे (Chava Sanghatana) पदाधिकारी विजय घाडगे (Vijay Ghadge) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan Resignation) यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज अजित पवारांनी तातडीने सूरज चव्हाण यांना बोलावले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जाते. दरम्यान, अजित पवारांनी आज दुपारी 12.11 वाजता लातूरमधील घटनेचा कडक शब्दात निषेध केला. त्यानंतर 12.59 वाजता लगेच दुसरे ट्विट करत सूरज चव्हाण यांना तातडीने पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली.
12.11 वाजताच्या ट्विटमध्ये अजित पवार काय म्हणाले?
काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या, असं अजित पवार ट्विटद्वारे म्हणाले.
काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही…
– अजित पवार (@ajitpawarspeaks) 21 जुलै, 2025
12.59 वाजताच्या ट्विटमध्ये अजित पवार काय म्हणाले?
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.
कालावधी लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत…
– अजित पवार (@ajitpawarspeaks) 21 जुलै, 2025
https://www.youtube.com/watch?v=S9ytsyz9viw
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.