नितीश कुमार रेड्डी भारतात परतणार, अर्शदीपही खेळणार नाही, टीम इंडियासमोर प्लेईंग 11 चं संकट!

आयएनडी वि इंजिन टेस्ट मालिका 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची सध्या कसोटी मालिका (IND vs ENG Test Series 2025) खेळवण्यात येत आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली असून चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र या चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) चौथ्या कसोटीतून आणि नितीशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

बीसीसीआयने आता सुधारित संघ जाहीर केला आहे. अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आला आहे.  बीसीसीआयने नितीश रेड्डीबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. नितीश लवकरच भारतात परतेल.

अर्शदीप सिंग चौथ्या कसोटीतून बाहेर-

बीसीसीआयने अर्शदीप सिंगबद्दलच्या निवेदनात म्हटले आहे की, अर्शदीप सिंगला मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बेकेनहॅममध्ये सराव सत्रादरम्यान नेटवर गोलंदाजी करताना अर्शदीपच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा सुधारित संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज.

23 जुलैपासून रंगणार चौथा कसोटी सामना-

भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर असेल.

संबंधित बातमी:

England host WTC Final News : आयसीसीने भारताला पुन्हा डावललं, 2031 पर्यंत WTC Final चं यजमानपद इंग्लंडकडेच, जय शाहांच्या निर्णयानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Eng vs Ind 4th Test : कुलदीप अन् जुरेल मँचेस्टरमध्ये खेळणार? ‘या’ खेळाडूंची सुट्टी, जिंकण्यासाठी कर्णधार गिल घेणार मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.