IND vs ENG: चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 4th Test Match) दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. सध्या या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच, इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. संघात एका तडाखेबाज खेळाडूची एन्ट्री झाली असून इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने लियाम डॉसनला (Liam Dawson) अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. त्याला शोएब बशीरच्या जागी संघात घेण्यात आले आहे. शोएब बशीर (Shoib Bashir) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे आता डॉसनला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे डॉसनने आपली कसोटी कारकीर्द भारताविरुद्धच सुरू केली होती. मात्र, तो गेल्या काही काळापासून इंग्लंडच्या संघात नव्हता. डॉसनशिवाय इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मॅचेस्टरच्या मैदानावर भारतीय संघाचं कसोटी रेकॉर्ड अतिशय निराशाजनक राहिलेलं आहे. टीम इंडियाने (Team india) या मैदानावर 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये टीम इंडियाने एकही सामना त्यांच्या नावावर केलेला नाही. त्यामुळे या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
झॅक कॅरुली, बेन डॉकेट, ओली पोप, जो रूट, होरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्नाधार), जेमी स्मिथ (यशर रक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वॉक्स, ब्रिडन कार, जोफ्रा आर्चर

Comments are closed.