सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद

पुरुष विभागात सतेज संघाने नांदेडच्या एस.एम. पटेल स्पोर्ट्स फाऊंडेशन संघावर मात करीत, तर महिला विभागात राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन संघावर सुवर्ण चढाई करीत विजेतेपद पटकावत यंदाची ‘कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक’ निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गाजविली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ‘सतेज संघ, बाणेर यांच्या वतीने बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments are closed.