मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा पंचक फॉर्म्युला, राज-उद्धव ठाकरेंना वेसण घालण्याचाही प्लॅन ठरला
बीएमसी निवडणूक 2025 साठी भाजपा रणनीती: अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातील भाजप आमदारांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या होत्या. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आमदारांना आपापल्या मतदारसंघातील पाच महत्त्वाच्या कामांची यादी देण्याची सूचना केली. ज्या कामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशा मतदारसंघातील पाच कामांची यादी द्यावी, ही कामं सरकारकडून तत्परतेने मार्गी लावली जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना दिले आहे. मुंबईतील भाजप (BJP) आमदारांशीही याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. यावेळी आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काय करायचे, याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. (BMC Election 2025)
या बैठकीत भाजप आमदारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची फारशी फिकीर करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केल्याचे समजते. उद्धव आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आले तर मतांच्या टक्केवारीत नक्कीच फरक पडेल. पण मराठी-अमराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपलाही होऊ शकतो. राज आणि उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक निवडून आले तरी पालिकेवर त्यांचीच सत्ता येईल असे नाही, असे मत भाजप आमदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला शिंदे गट आणि अजित पवार गटासोबतच लढायचे आहे. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपने आखली रणनीती
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपने रणनीती आखली आहे. मुंबईत महायुतीत कुठेही वाद नको, समन्वय राखा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे. यासाठी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रात मराठी मतदारांशी संपर्क वाढवण्याच्या सूचना भाजप आमदारांना देण्यात आल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=zvjitfu3Oei
आणखी वाचा
मिशन मुंबई, महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा प्लॅन ठरला!
आणखी वाचा
Comments are closed.