नेतन्याहू पागल झालेत लहान मुलासारखे वागतायत, सीरियावरील हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडले!

सीरियावर बॉम्बवर्षाव करणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिडले आहेत. ‘नेतन्याहू पागल झालेत, लहान मुलासारखे वागतायत,’ असा संताप ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

‘बघावं तेव्हा नेतन्याहू कुठे ना कुठे बॉम्ब टाकत असतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे ट्रम्प जागतिक शांततेसाठी करत असलेल्या प्रयत्नांना धक्का लागू शकतो,’ असे व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱयाने सांगितले.

ट्रम्प यांनी थेट फोन लावला!

मागील काही दिवसांपासून इस्रायल सीरियावर हल्ले करत आहे. अलीकडेच इस्रायलच्या हवाई दलाने सीरियाच्या राष्ट्रपती भवनाला लक्ष्य केले. गाझा पट्टीतील एकमेव होली फॅमिली पॅथॉलिक चर्चवरही बॉम्ब टाकले. त्यामुळे ट्रम्प भडकले आहेत.

नेतन्याहू यांना विषबाधा

बेंजामिन नेतन्याहू यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ते आजारी पडले आहेत. त्यांच्या आतडय़ाला सूज आली असून त्यांना सलाइन लावण्यात आले आहे. पुढचे तीन दिवस ते घरातूनच कामकाज करणार आहेत़

Comments are closed.