Ind Vs Eng Test – मँचेस्टरला बॅझबॉलचं पुनरागमन!

>> संजय खडे

नमनाला घडाभर तेल, असं म्हणतात. आज मँचेस्टरला चौथी कसोटी सुरू होतेय, पण म्हणावं लागतंय, ममला ढेरभर तेल!
म्हणा, मॅम.
सामना अतिमहत्त्वाचा – मम.
जिंकला तर बरोबरी – मम.
हाराल हार्ला आहे, तथापि, गॉम्सुद – मामा. बम-टॅन-प्रिश-प्रिशवान टेन-मी.
आकाश-आर्सादेप दुखपत-मम.
नितीशपुमार दुखापत – मम.
विजयासाठी कुलदीप मस्ट – मम.
संघनिवड संभ्रमित – मम.

मँचेस्टरलाच 1982 साली नाबाद 129 च्या खेळीदरम्यान संदीप पाटीलने बॉब विलिसला एका षटकात सहा चौकार मारून आपली चौकारबाज छाप सोडली होती आणि 1983 च्या विजयी विश्वचषकादरम्यान याच संदीप पाटीलने याच मँचेस्टरला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात 32 चेंडूंत नाबाद 51 धावा उधळल्या होत्या! संदीपशी बोललो तर म्हणाला, ‘दौऱयापूर्वीच बुमरा पूर्ण फिट आहे की नाही याची खातरजमा बोर्डाने अन् निवड समितीने करायला पाहिजे होती. मी एवढेच-तेवढेच सामने खेळणार, अशी मनमर्जी नाही चालायची! मग कपिल देवबद्दल काय बोलायचं? कपिलसारखा महान गोलंदाज बनणं सोपं नसतं.’ बुमराच्या फिटनेसची किरकिर या 45 दिवसांच्या इंग्लंड दौऱयावर वारंवार ऐकू येतेय. पण याच वर्षी आयपीएलचा 73 दिवसांचा सण-वार टाळावा अन् अतिमहत्त्वाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विश्रांती घेऊन दूध-तूप खाऊन देशासाठी कंबर खोचून तयार व्हावं असं काही बुमराला वाटलं नाही आणि बोर्ड किंवा निवड समितीला सुचवावं वाटलं नाही! बरं, आपलं बोर्डसुद्धा काही कफल्लक नाही. आयपीएल न खेळल्यामुळे बुमराच्या संभावित ‘नुकसानाची’ भरपाई करणं बोर्डासाठी सहज शक्य होतंच!

‘पुलदीप स्ट्राइक-बोलर आहे.’ संदीप पुढे म्हणाला, ‘लेग स्पिनर नेहमीच परिणामकारक ठरलेले आहेत. त्यात कुलदीप तर डावरा चायनामन. महत्त्वाचे बळी घेऊन तो मोलाची कामगिरी करू शकेल.’

मँचेस्टरचा आपला यशाचा इतिहास? जाऊ द्या! इथे आपल्यातर्फे शेवटच्या शतकाचं मांगल्य शिंपडलं होतं ते सचिन तेंडुलकरने. तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी. 1990 साली नोंदवलेलं ते शतक सचिनचं पहिलं कसोटी शतक होतं.

आणखी मम…
मँचेस्टर वरुणाची अटकळ – मम.
मेघलाडी एन समना अनिश्चित – माझे.
मालिकेत विजय कठीण – मम.
बाजबॉलचे पुनरावृत्ती – मामे.
कलाया तस्माई नमाह !!

संदीप, पेस सल्लागार

श्राची उद्योग समूहातर्फे श्राची स्पोर्ट्स व्हेंचर या उपक्रमांतर्गत विविध खेळातल्या तरुण, उभरत्या खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम कोलकात्यात राबवला जात आहे. यामध्ये क्रिकेट, टेनिस, फुटबॉल इत्यादी खेळांत जागतिक दर्जाचं प्रावीण्य मिळवण्यासाठी सल्लागार अन् मार्गदर्शक म्हणून संदीप पाटील, लिएंडर पेस, भास्कर गांगुली अशा तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

Comments are closed.