गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास 15 हजार दंड, पालिकेच्या नियमांचे विघ्न

मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी आज कठोर नियमावली जाहीर केली असून मंडपामुळे रस्त्यावर खड्डा पाडल्यास प्रतिखड्डा तब्बल 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याआधी प्रतिखड्डा केवळ 2 हजार रुपये आकारले जात होते. तर गेल्या वर्षीच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी शुल्कमाफी जाहीर केली असताना पालिकेने मात्र या वर्षी 100 रुपये भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांवर पालिकेच्या नियमांचे विघ्न आले आहे.

मुंबईमध्ये सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, तर सवा लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षी राज्य सरकारच्या आदेशानुसार पाच वर्षांसाठी परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पालिकेने आज जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सर्व मंडळांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

असा आहे हमीपत्रात गोंधळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास, विकण्यास परवानगी मिळाली आहे.

मात्र पालिकेने जाहीर केलेल्या हमीपत्रानुसार पर्यावरणपूरक मूर्ती बनवून नैसर्गिक नाही, तर कृत्रिम तलावात विसर्जनाचे बंधन.

आज कोर्टात सुनावणी

यावर उद्या 23 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायायलात सुनावणी होणार असताना पालिकेने घाईघाईने कठोर नियमावलीचे परिपत्रक का काढले, असा सवाल गणेशोत्सव समितीकडून उपस्थित केला जात आहे.

Comments are closed.