हॅम्पी – दिव्य प्रथम सामना
वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
युवा भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने दबावाला बळी न पडता फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या पहिल्या सामन्यात कोनेरू हम्पीला बरोबरीत रोखले. दोन्ही खेळाडूंना शनिवारी येथे आघाडी घेण्याच्या संधी मिळाल्या होत्या.
हम्पीला काळ्या रंगाच्या सेंगाट्या घेऊन खेळताना समाधान मानाव्या लागलेल्या या बरोबरीचा अर्थ असा की, या दोन वेळच्या वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन खेळाडूला दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात थोडीशी अनुकूलता प्राप्त होईल आणि जर कोंडी कायम राहिली, तर विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे सामने खेळविले जातील.
सुऊवातीपासूनच हा एक अतिशय आकर्षक सामना ठरला. हम्पीने आधी चूक केली आणि संगणकांनुसार 14 व्या चालीवर दिव्याने गोष्टी नियंत्रणात आणल्या. तथापि पुढे नागपूरच्या मुलीने पकड गमावली. 41 चालींमध्ये हा सामना अनिर्णीत राहिला. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफमध्ये माजी महिला विश्वविजेती झोंगयी टॅन आणि अव्वल मानांकित लेई टिंगजी यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला.
Comments are closed.