राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री येथे दाखल झाले आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून शिवसैनिक त्यांच्या भेटीला आले आहेत. उद्धव ठाकरे हे देखील मातोश्री येथे त्या शिवसैनिकांची भेट घेत आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी खुद्द उद्धव ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळत असल्याने शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Comments are closed.