क्रिकेट जगत थक्क! सचिनचा वारसा शुभमन गिलने चालवला, 1990 नंतर अशी कामगिरी करणार पहिला भारतीय

शुबमन गिल सेंचुरी ईएनजी वि इंड 4 था चाचणी: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडून दिली. मँचेस्टर कसोटीत दुसऱ्या डावात त्याने झळकावलेल्या शानदार शतकामुळे भारताला सावरता आले. या मालिकेतील गिलचं हे चौथं शतक आहे, यासोबतच त्याने एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

मँचेस्टरमध्ये गिलची जादू

दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली होती. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीसच झटपट विकेट्स घेत भारताला दबावाखाली आणलं होतं. अशा परिस्थितीत कर्णधार गिलने संयमाने खेळ करत जबरदस्त पुनरागमन केलं. सुरुवातीला सावध खेळ करत त्याने नंतर आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी सुरू केली. कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट्स आणि बॅकफुट पंचसारख्या फटक्यांनी त्याने इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली. गिलने 100 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 228 चेंडूंचा सामना केला.

35 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर गिलने घडवलेला पराक्रम इतिहासात नोंदवण्याजोगा ठरला. या मैदानावर यापूर्वी शेवटचा शतक 1990 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून आलं होतं. तब्बल 35 वर्षांनंतर शुभमन गिलने हे शतक झळकावत त्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. विशेष म्हणजे, भारतीय कर्णधाराकडून या मैदानावर शतक झळकवण्याचा पराक्रम मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 1990 मध्ये केला होता. त्यानंतर गिलनेच हे शतक झळकावत 35 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

डॉन ब्रॅडमन अन् गावसकरांच्या विक्रमाशी बरोबरी

गिलने या कामगिरीमुळे केवळ एकच नव्हे तर अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत 712 धावा केल्या होत्या. आता गिल त्या आकड्यालाही मागे टाकत पुढे गेला आहे. एवढंच नाही तर, डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत 4 शतक झळकावणारा गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे.

शुभमन गिलने केवळ उत्तम फलंदाजीच केली नाही, तर एका युवा कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये कोणती जबाबदारी कशी पार पाडावी, याचं उदाहरणही घालून दिलं आहे. मैदानावर गिलचा आत्मविश्वास, तंत्रशुद्ध फटकेबाजी आणि परिस्थितीनुसार खेळण्याची शैली ही भारतीय संघासाठी आश्वासक ठरत आहे. एकंदरीत, मँचेस्टरमध्ये गिलने केवळ शतक झळकावलं नाही, तर इतिहास घडवत स्वतःचं नाव भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली पंक्तीत नोंदवलं आहे.

हे ही वाचा –

Nitish Kumar Reddy News : टीम इंडियामधून बाहेर अन् आता थेट गुन्हा दाखल! पुरता फसला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

आणखी वाचा

Comments are closed.