IND vs ENG: 5व्या टेस्टपूर्वी टीम इंडिया चिंतेत, उपकर्णधार पंतनंतर आता हा खेळाडू जाणार बाहेर?

इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर टेस्टमध्ये भारताची संकटं वाढतच चालली आहेत. पहिल्या डावात फलंदाजी करताना रिषभ पंत गंभीर जखमी झाला असून तो आता पाचव्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. चौथ्या टेस्टदरम्यानही पंतने यष्टिरक्षण केलं नव्हतं. आता टीम इंडियाची चिंता आणखी वाढली आहे, कारण उपकर्णधार पंतनंतर कर्णधार शुबमन गिलही दुखापतीमुळे त्रस्त आहे.

दुसऱ्या डावात खेळताना शुभमन गिलच्या हातावर चेंडू लागला, ज्यामुळे तो जखमी झाला आणि त्याला पट्टी करावी लागली. नंतर जेव्हा गिल 90 धावांवर खेळत होता, तेव्हा बेन स्टोक्सचा चेंडू थेट त्याच्या हातावर लागला. त्यानंतर गिल खूप वेदनेत दिसला. तरीही शुबमनने शतक झळकावलं आणि त्यानंतर तो बाद झाला. मात्र, गिल जखमी असतानाच पुन्हा एकदा दुखापत होणं ही वाईट बातमी आहे. जर शुबमनची दुखापत गंभीर ठरली, तर तोसुद्धा पाचव्या टेस्टमधून बाहेर पडू शकतो.

भारतीय कर्णधार शुबमन गिलने इतिहासात आपले नाव कोरले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्यात गिलने पाचव्या दिवशी शतक झळकावले. या शतकासोबतच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर एखाद्या भारतीय फलंदाजाने या मैदानावर शतक ठोकले आहे. याआधी 1990 मध्ये सचिन तेंडुलकरने ओल्ड ट्रॅफर्डवर शतक झळकावले होते.

Comments are closed.