IND vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा की बेन स्टोक्स; कपिल देव यांनी सांगितले जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूच नाव

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत दुसरा कसोटी सामना सोडला तर टीम इंडियाला उर्वरित दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीमध्येही टीम इंडिया पिछाडीवर असून इंग्लंडने सामन्यावर पकड निर्माण केली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेवर भाष्य केलं तसेच त्यांना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कोण, असं विचारण्यात आलं. यासाठी बेन स्टोक्स आणि रविंद्र जडेजा या दोन खेळाडूंचे पर्याय त्यांना देण्यात आले. तेव्हा कपिल देव म्हणाले की, “मी तुलना करत नाही. बेन स्टोक्स एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु मला अजूनही वाटत आहे की जडेजा स्टोक्सपेक्षा पुढे आहे. तो खूप चांगलं प्रदर्शन करत आहे.” असं म्हणत त्यांनी रविंद्र जडेजाला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानलं आहे.

WI vs AUS – रोवमैन पॉवेलने फक्त 28 धावा केल्या आणि ‘युनिव्हर्सल बॉस’चा विक्रम उद्ध्वस्त केला

यावेळी कपिल देव यांना जसप्रीत बुमरा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की,”मला वाटतंय की प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाच शरीर वेगळं आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. सर्वांना एकाच तराजूमध्ये तोलनं योग्य नाही. जसप्रीत आपल्याकडे असणाऱ्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. परंतु त्याची अॅक्शन वेगळी आहे आणि अशा परिस्थितीत फिटनेस राखणं कठीण आहे. आम्हाला वाटलं नव्हत की त्याची कारकीर्द इतकी असेल कारण तो त्याच्या शरीरावर खूप ताण देते. असे असूनही त्यांने टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि करत आहे.” असं म्हणत कपिल देव यांनी जसप्रीत बुमराच कौतुक केलं आहे.

Comments are closed.