IND vs ENG: 35 वर्षांची प्रतीक्षा संपवत शतकवीर कर्णधार गिलने मोडले 5 मोठे विक्रम!
मॅंचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने (Team india) अजून खातेही न उघडता दोन विकेट्स गमावल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) जबाबदारी स्वीकारत शानदार शतक ठोकलं. त्यांच्या या शतकामुळे टीम इंडियाचा 35 वर्षांचा प्रतिक्षेचा काळही संपला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शतक झळकावणारा गिल आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
गडबडीत विकेट्स पडलेल्या डावात फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलने या डावात 103 धावा केल्या. यासोबतच तो मॅंचेस्टरच्या या मैदानावर 35 वर्षांनंतर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी 1990 मध्ये सचिन तेंडुलकरने इथे कसोटी शतक झळकावलं होतं.
शुबमन गिल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा आणि गिल दोघांनीही 9-9 शतकं झळकावली आहेत. शुबमन गिल हा क्रिकेट इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने परदेश दौऱ्यातील एकाच कसोटी मालिकेत 4 शतकं ठोकली आहेत.
डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांनीही एकाच कसोटी मालिकेत 4-4 शतकं केली होती, पण हे दोघंही घरच्या मैदानावर खेळले होते. याआधी टीम इंडियासाठी फक्त दोन खेळाडूंनी एका मालिकेत 4 शतकं झळकावली होती. सुनील गावसकर (Shubman gill) आणि विराट कोहली (Virat Kohli). आता शुबमन गिलही या खास यादीत सामील झाला आहे. शुबमन गिल हा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत 4 शतकं करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
तर वॉरविक आर्मस्ट्रॉन्ग, डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या 5 खेळाडूंनी त्यांच्या कर्णधार म्हणून पहिल्या मालिकेत 3-3 शतकं झळकावली होती. याशिवाय शुबमन गिल ह्या इंग्लंड दौऱ्यात 700 कसोटी धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे.
Comments are closed.