IND vs ENG: गिल 'किंग' बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर, गावसकर क्लबमध्ये केली एन्ट्री!

इंग्लंड दौऱ्यात कर्णधार शुबमन गिलसाठी (Shubman gill) ही वेळ अत्यंत विरोधाभासी ठरली आहे. एकीकडे मॅंचेस्टर कसोटीत (IND vs ENG 4th Test) कर्णधार म्हणून त्याला जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांच्या टीका सहन कराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे त्याची फलंदाजी मात्र आपल्या खास शैलीत उत्तर देत आहे. गिलच्या फलंदाजीतून विक्रमी खेळी घडत असून, ती थेट रेकॉर्डबुकमध्ये नोंदवली जात आहे.

चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी 87व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सिंगल घेत गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केलं. या कामगिरीसोबतच गिल भारतासाठी एका मालिकेत सर्वाधिक शतके ठोकणारा संयुक्तरित्या तिसरा फलंदाज ठरला आहे आणि केवळ दुसरा असा भारतीय कर्णधार बनला आहे.

सध्या सुरू असलेल्या मालिकेत गिलचे हे चौथे शतक आहे, ज्यामध्ये एक द्विशतकही समाविष्ट आहे. म्हणजेच, जर ओव्हल कसोटीतही गिलने शतक ठोकले, तर तो या यादीत सर्वांचा ‘बॉस’ ठरेल.

एका मालिकेत सर्वाधिक शतक ठोकण्याचा पराक्रम सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दोन वेळा केला होता. एकदा 1971 मध्ये वेस्ट इंडीजच्या मैदानावर आणि दुसऱ्यांदा 1978-79 मध्ये भारतीय मैदानावर. आजही गावसकर हे असं करणारे एकमेव भारतीय फलंदाज आहेत. माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर 4 शतके झळकावली होती, पण तेव्हा कोहली कर्णधार न्हवता. त्याने ही कामगिरी फलंदाज म्हणून केली होती.

आता शुबमन गिलसमोर (Shubman gill) या दोघांनाही मागे टाकण्याची मोठी संधी आहे आणि तो त्या विक्रमापासून केवळ ‘एक पाऊल’ म्हणजेच ओव्हलमधील एक शतक इतकाच दूर आहे. सध्या गिल ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, ते पाहता ही कामगिरी तो करेल.

Comments are closed.