Video : 8 षटकार, 15 चौकार; इंग्लंडमध्ये एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ, 3 दिवसांत ठोकले दुसरे शतक
ऑस्ट्रेलियाविरूद्ध 39 बॉलमध्ये एबी डी व्हिलियर्स शतक: सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या (World Championship Of Legends 2025) दुसऱ्या हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे, आणि या स्पर्धेत निवृत्त झालेल्या क्रिकेट दिग्गजांचे जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्स या स्पर्धेत भाग घेत आहे आणि तो सध्या तुफानी फॉर्ममध्ये आहे. केवळ तीन दिवसांत त्याने दोन जबरदस्त शतके झळकावली आहेत. यापैकी त्याचे दुसरे शतक ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाविरुद्ध आले.
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाविरुद्ध फक्त 39 चेंडूंमध्ये डिविलियर्सचे शतक!
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिविलियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्वतः जे. जे. स्मट्ससोबत सलामीला उतरला. एकदा का दोघे मैदानात उतरले की त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 187 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या दरम्यान डिविलियर्सने केवळ 39 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्याने 15 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 123 धावांची जबरदस्त खेळी केली.
सेवानिवृत्ती? काय सेवानिवृत्ती? 💁💁
एबीडी त्याच्या 41-चेंडूंच्या शंभर वि इंग्लंडचा पाठपुरावा 39-चेंडू शंभर वि ऑस्ट्रेलियासह 🔥 🔥#डब्ल्यूसीएल 2025 #Abdevilliers pic.twitter.com/lk89e3jssc
– फॅनकोड (@फॅनकोड) 27 जुलै, 2025
डिविलियर्सचं हे गेल्या तीन दिवसांतील दुसरं शतक ठरलं. याआधी 24 जुलै रोजी इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध त्याने नाबाद 116 धावांची खेळी करत शतक झळकावलं होतं आणि आपल्या संघाला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता.
कांगारूंना ‘सळो की पळो’ करून सोडले
डिविलियर्ससोबत जे. जे. स्मट्सने देखील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 53 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 85 धावा ठोकल्या. फक्त 15 धावांनी तो शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. मात्र, या दोघांच्या खेळीनंतर दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अखेरीस प्रोटियाज संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 241 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 120 चेंडूंमध्ये 242 धावांची गरज आहे, जे अजिबात सोपे नाही.
सेवानिवृत्ती? काय सेवानिवृत्ती? 💁💁
एबीडी त्याच्या 41-चेंडूंच्या शंभर वि इंग्लंडचा पाठपुरावा 39-चेंडू शंभर वि ऑस्ट्रेलियासह 🔥 🔥#डब्ल्यूसीएल 2025 #Abdevilliers pic.twitter.com/lk89e3jssc
– फॅनकोड (@फॅनकोड) 27 जुलै, 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.