मुंबई-वाराणसी इंडिगो विमान दोन तास धावपट्टीवरच, प्रवाशांमध्ये संताप

मुंबईहून वाराणसीला जाणारे इंडिगोचे विमान सुमारे दोन तास धावपट्टीवरच उभे होते. विमानाला झालेल्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. विमानाला विलंब का झाला याबाबत क्रू मेंबर्सकडून कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात आली नाही. तसेच विमानातून आवाज येत होता असेही एका प्रवाशाने सांगितले. प्रवाशांच्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखेर दोन तासाहून अधिक काळ

मुंबईहू वाराणसीला निघालेले 6E 502 हे इंडिगोचे विमान दोन तास धावपट्टीवरच उभे होते. नक्की काय समस्या आहे याबाबत प्रवाशांना काहीच कल्पना दिली नाही. संतपालेल्या प्रवाशांनी विमानात गोंधळ घालायला सुरवात केली. ग्राऊंड स्टाफ विमानाची तपासणी करत असताना एअरहोस्टेस प्रवाशांना शांत रहायची विनंती करत होती. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याचे आवाहन करत होती. अखेर विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा दोन तासांहून अधिक विलंबाने शनिवारी रात्री 9.53 ला विमानाने वाराणसीच्या दिशेने उड्डाण केले.

Comments are closed.