बीसीसीआयने केली संघाची घोषणा! तिलक वर्माकडे संघाची धुरा, तर साई सुदर्शनला वगळलं

दुलेप ट्रॉफी: भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यात तिलक वर्मा साउथ झोन संघाचे कर्णधारपद भूषवू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी हंगामासाठी झोन स्वरूपाची वापसी केली आहे, ज्यात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांची नावे ईस्ट झोन, वेस्ट झोन, साउथ झोन, नाॅर्थ झोन, सेंट्रल झोन आणि नाॅर्थ-ईस्ट झोन अशी असतील. आता ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एका वृत्तानुसार, तिलक वर्मा दक्षिण विभागाच्या संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. (Duleep Trophy 2025)

‘द इंडियन एक्सप्रेस’नुसार, तिलक वर्मा साउथ झोन संघाचा कर्णधार असेल (Tilak Varma captain Duleep Trophy), तर मोहम्मद अझरुद्दीन उपकर्णधाराची भूमिका बजावेल. दक्षिण विभागाच्या संघात अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश असेल, ज्यात साई किशोर, देवदत्त पडिक्कल, एन. जगदीशन आणि विजयकुमार वैशाक यांचाही समावेश आहे. सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असलेला साई सुदर्शनला संघातून वगळण्यात आले आहे. (Sai Sudharsan excluded Duleep Trophy)

तिलक वर्मा एखाद्या संघाचे कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ नसेल. गेल्या हंगामात तो अनेकदा हैदराबाद संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसला होता. गेल्या वर्षी अशी बातमी होती की बीसीसीआय झोनल सिस्टीम पूर्णपणे रद्द करू शकते, परंतु आता त्याच झोनल सिस्टीमची वापसी करण्यात आली आहे. याच वर्षी मार्च महिन्यात बीसीसीआयच्या एका बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला होता, जो आगामी देशांतर्गत हंगामात लागू केला जाईल. (BCCI zonal format)

दुलीप ट्रॉफीमध्ये 6 झोनल संघ तयार करण्यात आले आहेत, ज्यात 38 देशांतर्गत संघांतील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दुलीप ट्रॉफीची सुरूवात 28 ऑगस्ट रोजी होईल आणि फायनल सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. गेल्या हंगामात संघांची नावे इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशी होती, ज्यात इंडिया ए ने विजेतेपद पटकावले होते.

दक्षिण झोन श्वाड (दक्षिण झोन दुलेप ट्रॉफी पथक)- तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), टी. अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, एन. जगदीशन, टी. विजय, साई किशोर, टी. त्यागराजन, विजयकुमार वैशाक, निधिश एमडी, रिकी भुई, बेसिल एनपी, गुरजापनीत सिंग, स्नेहल कौथंकर

Comments are closed.