तेलंगणातील 64 विद्यार्थ्यांनी शिळे अन्नामुळे विषबाधा केली
सर्कल संस्था/हैदराबाद
तेलंगणातील नागरकुर्नूल जिह्यातील सरकारी मुलींच्या निवासी शाळेतील 64 विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि अतिसाराचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिळे अन्न सेवन केल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याचे समजते. दिवसभराच्या उपचारानंतर 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. अन्य विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेची चौकशी केली जात असून अन्न आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे घटनेचे नेमके कारण उलगडल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. शनिवारी रात्री उय्यलवाडा येथील निवासी शाळेत जेवण केल्यानंतर 64 विद्यार्थी आजारी पडले. उपचारासाठी त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची लक्षणे आढळल्याने निवासी शाळा प्रशासनाची धावपळ उडाली.
Comments are closed.