Maharashtra Breaking News: पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा
Maharashtra Breaking News: लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात येणार आहे. अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर यांच्याकडून सरकारची बाजू मांडण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता आहे. रमी आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Comments are closed.