सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स भांडत राहिला; जडेजा अन् सुंदरसोबत काय केलं?, VIDEO
Ind vs ENG चौथी चाचणी: भारतीय संघातील शुभमन गिल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं इंग्लंडविरुद्धची (Ind Vs Eng 4th Test) चौथी कसोटी वाचवली. भारतीय संघाने आपली क्षमता आणि गुणवत्ता दाखवून देताना जवळपास गमावलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखत यजमान इंग्लंडचा विजय अक्षरशः हिसकावून घेतला. भारताच्या या झुंजार फलंदाजीचं कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, सामन्यातील पाचवा दिवसाचा खेळ संपण्यासाठी 20-25 मिनिटं बाकी असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स टीम इंडियासमोर मॅच लवकर ड्रॉ करण्यासाठी गयावया करु लागला. मात्र भारताने ही ऑफर धुडकावून लावली.
स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिली तेव्हा जडेजा आणि सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होते. जडेजा 89 तर सुंदर 80 धावांवर खेळत होते. स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रुममधून स्पष्टपणे नकार दिला. दोघांनीही सामना ड्रॉपर्यंत पोहचवण्यासाठी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे दोघांनीही शतक करावे, अशी गिल आणि गंभीरची भावना होती. त्यामुळे गिल आणि गंभीरने जडेजा आणि सुंदरला फलंदाजी सुरु ठेवण्यास सांगितले.
इंग्लंड, जडेजा आणि सुंदर यांच्यात ड्रॉ नाटक. 🔥pic.twitter.com/o7st0slhoz
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 28 जुलै, 2025
जडेजा अन् सुंदरने ऑफर नाकारताच स्टोक्स संतापला-
सामना ड्रॉ करण्याची बेन स्टोक्सची ऑफर जडेजा अन् सुंदरने नाकारल्यानंतर बेन स्टोक्ससह इंग्लंडचे अनेक खेळाडू संतापल्याचे दिसून आले. यावेळी मैदानात चांगलाच ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरसोबत हात मिळवला नाही. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स याच मुद्द्यावरुन भांडत राहिल्याचं समोर आलं.
सामना कसा राहिला?
मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. भारताचा पहिला डाव 358 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून साई सुदर्शनने 61, यशस्वी जैस्वालने 58, ऋषभ पंतने 54, के.एल. राहुलने 46, शार्दुल ठाकूरने 41 आणि वॉशिंग्टन सुंदरने 27 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करत 5 बळी घेतले. उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात भक्कम 669 धावा फटकावल्या आणि भारतावर 311 धावांची मोठी आघाडी घेतली. जो रूटने 150 आणि कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची शानदार शतकी खेळी केली. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन दोघेही शून्यावर बाद झाले. मात्र नंतर शुभमन गिल आणि के.एल. राहुलने जबरदस्त झुंज दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. राहुलने 230 चेंडूत 90 धावा केल्या, तर गिलने शतकी खेळी करत 103 धावा फटकावल्या. यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजी करत भारताला पराभवापासून वाचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची अभेद्य भागीदारी केली. जडेजा 107 आणि सुंदर 101 धावा करून नाबाद राहिले. अखेर या दोघांच्या खेळीमुळे सामना ड्रॉ राहिला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.